नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – मानवत येथील नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी काल रविवारी 23 रोजी शांततेत मतदान पार पडले 58.85% मतदारांनी मतदान केले.
एकुण 26 हजार 157 मतदारांपैकी 15 हजार 395 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात 8 हजार 299 पुरुष तर 7 हजार 96 स्री मतदारांनी सहभाग नोंदविला सोमवार, 25 जुन रोजी मानवत तहसील येथे मतमोजणीला सुरूवात झाली. यात सुरुवाती पासूनच भाजपने आघाडी कायम ठेवली.

भाजपचे उमेदवार प्रा.एस.एन.पाटिल यांनी 12 हजार 210 मते मते घेऊन कॉग्रेस उम्मेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला यात कॉग्रेस उमेदवार 2771 अन्य एक अपक्ष 273 मते मिळाली.

निकालानंतर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही निवडणूक येत्या विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे मागील वेळी कॉग्रेसचा किंचित मतांनी पराभव झाला होता, मात्र या वेळी मोठ्य़ा संख्येने कॉग्रेस उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग