‘भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करून विजय मिळवला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. परिणामी, भाजपकडून जोरदार टीकास्त्र सोडली गेली. भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले,. “दुसऱ्यांच्या घरात चोरी करून विजय मिळवला आहे. भाजपला मिळवलेला विजय हा दुसऱ्याच्या घरात चोरी करून मिळालेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरात चोरी करायची आणि त्याला आपली सत्ता म्हणायचं अशातला हा प्रकार आहे. आम्हाला पाच जागा मिळतील आणि आमचं आघाडीचे सरकार देखील पाच वर्षे टिकेल.”

दरम्यान, अमरीश पटेल यांनी अमरीश पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीला मोठे नुकसान झालं आहे. भाजपकडून निवडणुकीला उभा राहिलेल्या अमरीश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. अमरीश पटेल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीला मोठे नुकसान झाला आहे त्यावरही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे सुरेश पटेल यांना तब्बल ३३२ मते मिळाली त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी विजय प्राप्त केला. अमरीश पटेल यांचा या मतदार संघातील हा सलग तिसरा विजय आहे. धुळे नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीकडे २१३ सदस्यांची ताकत होती. तर भाजपकडे १९९ सदस्य होते, असे असतानाही अमरीश यांनी महाविकास आघाडीची मते फोडण्यात यश मिळवलं. महाविकास आघाडीचे उमेदवार यांना केवळ ९८ मते मिळाली.