Video : निवडणूक कर्मचारीच सांगत होता ‘ते’ बटन दाबा ; भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

मुरादाबाद : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुरादाबाद येथील बुथ क्रमांक २३१ वरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केली. बुथवरील मतदान कर्मचारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे सायकल चिन्हासमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. देशभरातील ११७ लोकसभा मतदारसंघांचे मतदान पार पडत आहे. यादरम्यान काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटना समोर येत आहेत. परंतु मुरादाबाद येथे बुथवरील निवडणूक अधिकारीच मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकलसमोरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. यानंतर तेथे प्रचंड गदारोल माजला होता. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांनी मध्यस्थी करत निवडणूक कर्मचाऱ्याला सोडवले.

Loading...
You might also like