OMG : काँग्रेसला झाले तरी काय ?, भाजप कार्यकर्त्याला बनवले युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव

जबलपुरः पोलीसनामा ऑनलाईन – एका पक्षाच्या कार्यकत्याला दुसऱ्या पक्षात नेता बनवले अस कधी ऐकीवात नाही. मात्र असा प्रकार मध्य प्रदेशच्या राजकारणात घडला आहे. आठ महिन्यापूर्वी दिग्‍गज नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्यासोबत काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेल्या हर्षित सिंघई (Harshit Singhai) यांना नुकत्याच जाहीर झालेल्या युवक काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव पद देण्यात आले आहे. काँग्रेससाठी ही मोठी चूक मानली जात आहे. यावर काँग्रेसमध्ये सुरु असल्याच्या गोंधळाचा हा परिणाम असल्याचे म्हणत भाजपकडून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.

सिंघईंनी पत्राद्वारे दिली होती माहिती
दिग्गज नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडताना पार्टी सोडण्याबरोबरच हर्षित यांनी काँग्रेस आणि युवा काँग्रेसच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्टी सोडत असल्याची माहिती दिली होती. असे असताना 8 महिन्यांनंतर काँग्रेसने त्यांना सचिवपद दिल गेले आहे. हर्षित यांच्यानुसार ही छोटी चूक नाही, तर काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी दलामध्ये होणाऱ्या गोंधळाचा परिणाम आहे.

सिंघई पदाचा स्वीकार करणार नाहीतः खान
काँग्रेसच्या या चुकीवर भाजप प्रवक्ता जमा खान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ यामागे कारण असल्याचे सांगितले आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे समर्थक हर्षित यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ते या पदाचा स्वीकार करणे वा काँग्रेसमध्ये पुन्हा जाऊ इच्छित नाही.