‘कोरोना’वर प्रत्येक लढ्यासाठी तयार भाजपा कार्यकर्ता, लॉकडाऊन उघडताच राजकारण तापणार

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाला तोंड देण्याची पद्धत, लॉकडाऊन आणि मदत पॅकेजवरून वक्तव्यांचा बाजार गरम आहे. विरोधी पक्षांकडून प्रवासी मजूर, त्यांचे खाणे-पिणे यापासून केंद्रीय पॅकेजपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लॉकडाऊन लावल्यानंतर प्रश्न उपस्थित करणारे आता लॉकडाऊन हटवण्याबाबतही प्रश्न विचारत आहेत. यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की, लॉकडाऊन उघडल्यानंतर राजकारण तापणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपाने सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांना जागृत करण्याचे काम सुरू केले आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर ते प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील.

30 मे रोजी मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना सरकारच्या उपक्रमांविषयी जागृत करणार आहे. भाजपाने एक नवी प्रथा सुरू केली आहे. पार्टीचे प्रवक्तेच केंद्रीय मंत्र्यांची मुलाखत घेत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी सुधांशु त्रिवेदी, संबित पात्रा, नलिनी कोहली आणि जीव्हीएल नरसिंहा राव यांनी प्रश्नोत्तराच्या रूपाने चर्चा केली आणि भाजपाच्या सोशल मीडियावर त्याचे प्रसारण करण्यात आले. किती लोक हा कार्यक्रम पाहात आहेत याकडे सतत लक्ष देखील ठेवण्यात आले.

प्रवक्त्यांना सांगण्यात आले होते की, असे प्रश्न विचारा की, जे सर्वसामान्यांशी संबंधित असतील. सरकार कोरोनाच्या बाबतीत प्रथम सावध झाले, प्रथम पावले उचलली, प्रथम समन्वय साधला आणि आता 21 लाख करोडचे पॅकेज घोषित केले. प्रश्नोत्तरे अशी करण्यात आली की संपूर्ण प्रकरण समोर यावे. हेतू केवळ एवढाच होता की, जे काही राजकीय आरोप्रत्यारोप सुरू आहेत त्यावर सरकारचे म्हणणे खालपर्यंत जावे आणि कार्यकर्त्यांना ते समजावे आणि त्यांना त्यांच्या पातळीवर विरोधकांवर पलटवार करता यावा. असे सांगितले जाते की, हर्ष वर्धन यांच्या मुलाखतीसह या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

30 मेरोजी नरेंद्र मोदी सरकार-2 ला एक वर्ष पूर्ण होत आहे. पक्षाकडून यामध्ये मोदी सरकारला कोविड हिरो म्हणून सादर करण्याचा प्रयत्न आहे, ज्याने भारताला कोरोनाच्या संकटातून वाचवले. तत्पूर्वी पक्षाकडून सर्व कार्यकर्त्यांना जागृत करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाला तोंड देण्याची पद्धत, लॉकडाऊन आणि मदत पॅकेजवरून वक्तव्यांचा बाजार गरम आहे. विरोधी पक्षांकडून प्रवासी मजूर, त्यांचे खाणे-पिणे यापासून केंद्रीय पॅकेजपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लॉकडाऊन लावल्यानंतर प्रश्न उपस्थित करणारे आता लॉकडाऊन हटवण्याबाबतही प्रश्न विचारत आहेत. यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की, लॉकडाऊन उघडल्यानंतर राजकारण तापणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपाने सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांना जागृत करण्याचे काम सुरू केले आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर ते प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील.

30 मे रोजी मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना सरकारच्या उपक्रमांविषयी जागृत करणार आहे. भाजपाने एक नवी प्रथा सुरू केली आहे. पार्टीचे प्रवक्तेच केंद्रीय मंत्र्यांची मुलाखत घेत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी सुधांशु त्रिवेदी, संबित पात्रा, नलिनी कोहली आणि जीव्हीएल नरसिंहा राव यांनी प्रश्नोत्तराच्या रूपाने चर्चा केली आणि भाजपाच्या सोशल मीडियावर त्याचे प्रसारण करण्यात आले. किती लोक हा कार्यक्रम पाहात आहेत याकडे सतत लक्ष देखील ठेवण्यात आले.

प्रवक्त्यांना सांगण्यात आले होते की, असे प्रश्न विचारा की, जे सर्वसामान्यांशी संबंधित असतील. सरकार कोरोनाच्या बाबतीत प्रथम सावध झाले, प्रथम पावले उचलली, प्रथम समन्वय साधला आणि आता 21 लाख करोडचे पॅकेज घोषित केले. प्रश्नोत्तरे अशी करण्यात आली की संपूर्ण प्रकरण समोर यावे. हेतू केवळ एवढाच होता की, जे काही राजकीय आरोप्रत्यारोप सुरू आहेत त्यावर सरकारचे म्हणणे खालपर्यंत जावे आणि कार्यकर्त्यांना ते समजावे आणि त्यांना त्यांच्या पातळीवर विरोधकांवर पलटवार करता यावा. असे सांगितले जाते की, हर्ष वर्धन यांच्या मुलाखतीसह या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

30 मेरोजी नरेंद्र मोदी सरकार-2 ला एक वर्ष पूर्ण होत आहे. पक्षाकडून यामध्ये मोदी सरकारला कोविड हिरो म्हणून सादर करण्याचा प्रयत्न आहे, ज्याने भारताला कोरोनाच्या संकटातून वाचवले. तत्पूर्वी पक्षाकडून सर्व कार्यकर्त्यांना जागृत करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like