‘काँग्रेस हाय कमांडला कमी डोकं’, जे.पी. नड्डांची राहुल गांधींवर ‘जहरी’ टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची काहीच माहिती नाही असं वक्तव्य करत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नागिरकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेसनं विरोध केल्यानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेतृत्वाला डोकं कमी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले, “मला विरोधी पक्षांना विचारायचं आहे की, अखेर त्यांना सीएएची काय अडचण आहे. माझं राहुल गांधींना असं सांगणं आहे की, त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती काद्यावर 10 ओळी बोलून दाखवाव्यात. त्यांच्याकडे डोकं कमी आहे हे काँग्रेसचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस नेतृत्वाला सीएएबद्दल जास्त काही माहितीच नाहिये. काँग्रेस नेतृत्व नागरिकत्व कायद्यावरून देशाची दिशाभूल करत आहे.”

नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यलयात बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा बनवला तेव्हा विरोधी पक्षांनी मतांचं राजकारण करत लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहेत की, सीएएमुळे त्यांचं नागरिकत्व जाईल.”

शरणार्थींविषयी बोलताना जे पी नड्डा म्हणाले, “सीएए लागू करण्याअगोदर शरणार्थींच्या मुलांना शाळा – कॉलेजात प्रवेश मिळत नसे. त्यांना भारतात घर बनवता येत नव्हतं.पंतप्रधान मोदींनी आता तुमचा रस्ता मोकळा केला आहे. आता तुम्हीही भारताचे नागरिक आहात आणि तुम्हाला नागरिकांचे सर्व अधिकार प्राप्त आहेत. तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की, जी लोकं भारतात आली आहेत त्यातील जास्त करून लोक दलित आहेत. कोणी पाकिस्तानातून आलं आहे तर कोणी बांग्लादेशातून.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/