भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडून ५० लाखासाठी सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या ६ तासात छडा लावून ६ जणांना अटक केली आहे. भाजयुमोचा पदाधिकारी शुभम तोलवाणी हा या अपहरणाच्या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याचे उघडकीस आले असून मुलाच्या शोधासाठी तोच त्याच्या वडिलांबरोबर फिरताना दिसत होता.

शुभम तोलवाणी याने या अपहरणाचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण केलेल्या हर्ष ईश्वर नचवाणी (वय १७) याची सुटका करुन ६ जणांना अटक केली. त्यांचा एक साथीदार मुंबईला पळून गेल्याचे उघड झाले आहे.

शुभम हा भाजयुमोचा पदाधिकारी आहे. त्याला क्रिकेटवर सट्टा खेळायचा नाद आहे. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सट्टा खेळत असताना त्याला मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले होते. ते चुकविण्यासाठी त्याने हर्ष नचवाणी या मुलाचे अपहरण करुन खंडणी उकळण्याचा कट रचला व यवतमाळ येथील गुंड उन्नरकाठ याला सुपारी दिली.

सोमवारी सकाळी हर्ष नचवाणी हा राठी क्लासला जात असताना वाटेत त्याचे या गुंडांनी अपहरण केले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ईश्वर नचवाणी यांना एकाने कळविले की, तुमची दुचाकी नाल्यात पडली आहे. तेव्हा त्यांना वाटले की हर्ष याला अपघात झाला असावा, म्हणून ते सर्व हॉस्पिटलमध्ये शोधाशोध करु लागले. तेव्हा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना एक मोबाईल आला व त्यात तुमच्या मुलाचे अपहरण केले असून सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर काही वेळात अपहरणकर्ते यशला बेल्टने जबर मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर आला. हे पाहिल्यावर त्यांनी पैसे देण्यासाठी काही मुदत देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

अपहरणाची घटना पाहून यवतमाळ शहरातील सर्व विभाग सतर्क झाले. नचवाणी यांच्या मोबाईलवर आलेला फोन, व्हिडिओ याचे सायबर क्राईम विभागाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून हे मोबाईल कोणाचे आहेत, याची माहिती काढण्यात आली. त्या मोबाईलवर आलेल्या फोनची पडताळणी सुरु केली.
त्यावेळी नचवाणी यांच्याबरोबर शुभम तोलवाणी हा सातत्याने होता. अपहरणकर्त्यांच्या मोबाईलवर शुभम याचे फोन झाल्याचे रेकॉर्डमध्ये दिसून आले. त्यामुळे पोलिसांना शुभमवर संशय आला. त्यांनी शुभमला पोलीस मुख्यालयात आणले व त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. काही वेळातच त्याने या अपहरणाची कबुली दिली.

हर्षचे अपहरण करुन गुंड त्याला दारव्हा रोडवरील जंगलात घेऊन गेले. तेथे हर्षला बेल्टने मारहाण करुन त्याचा व्हिडिओ बनविण्यात आला. सायंकाळी आरोपी हर्षला घेऊन यवतमाळ शहरातील बोरलेनगर येथील एका घरात घेऊन आले. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या घरावर छापा घालून हर्षची सुटका केली. तेथील गुंडांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा हे नाट्य उघडकीस आले.
पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या तपासामुळे अवघ्या काही तासात अपहरण नाट्यातील आरोपींना पकडण्यात यश आले.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी