मराठा आरक्षणानंतर ‘या’ मुद्यावरुन भाजपने दिला आंदोलनाचा इशारा; ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने BJP आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजप 3 जून रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. अशी घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.

‘या’ देशात मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल, जाणून घ्या कारण

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर बोलताना राम शिंदे यांनी सांगितले की, न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या BJP पाठपुराव्यानंतरही राज्यातील ठाकरे सरकारने राज्य मागासवर्ग स्थापन केलेला नाही. हा आयोग स्थापन करुन न्यायालयाकडे मुदत मागितली असती तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण टिकले असते. राज्य सरकारच्या नकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या गुरुवारी (दि.3) राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

.

सरकार नेहमीप्रमाणे निष्क्रिय राहिले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं. मात्र, नेहमीप्रमाणे राज्य सरकार निष्क्रिय राहिले. त्यामुळे राज्यात ओबीसींसाठी कोणतेही राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही. जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असे सांगून देखील दिशाभूल केली जात आहे. या आरक्षणाची गरज का आहे, हे सिद्ध करण्यासाठी आकडेवारी तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्ग आयोग अस्तित्वात असावा लागतो. त्याचे देखील पुनर्गठण करण्यात आलेले नाही. राज्य सरकारला याचे गांभीर्यच समजलेले नाही. हे सरकार सव्वावर्ष ढिम्म राहिले, त्यामुळे ओबीसी आरक्षणासंबंधी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जारी केलेला अध्यदेशही रद्दबातल झाला असल्याचा आरोप राम शिंद यांनी केला आहे.

 

विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा
2010 पासून सर्वोच्च न्यायालयाने या आकडेवारीसंदर्भात निर्देश दिले होते. मात्र मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात राज्य सरकारने निष्काळजीपणा केला. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या निष्काळजीपणा वर बोट ठेवले. मागासवर्ग आयोग नेमण्यास सरकारकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांच्या हेतूवर शंका येत आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. विश्वासघात करणारे ओबीसी समाजाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे आता मगरीचे अश्रू ढाळत असले तरी या नामुष्कीस तेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राम शिंदे यांनी केली.

 

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !