HM अमित शहांचा CM केजरीवालांना ‘टोला’, म्हणाले – ‘चष्मा लावूनही शाळा-महाविद्यालये दिसत नाहीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये 20 महाविद्यालय सुरु करण्यात येतील असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. मात्र, चश्मा लावूनही महाविद्यालय दिसत नसल्याचे सांगत गृहमंत्री अमित शहा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. दिल्लीमधील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये भाजपने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करताना ते बोलत होते.

पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे सरकार आता काम करत आहे. त्यांनी 20 महाविद्यालये सुरु करण्यात येतील असे सांगितले होते. तसेच पाच हजाराहून अधिक शाळा उभारण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. मात्र, चश्मा लावूनही शाळा आणि महाविद्यालये दिसत नसल्याचे सांगत शहा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केल्यानंतर केजरीवाल यांनी ट्विट करुन त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अमित शहा यांचे पूर्ण भाषण ऐकलं असून मला वाटलं की ते दिल्लीच्या वकासाबद्दल बोलतील. मात्र, अमित शहा मला शिव्या देण्याच्या व्यतिरिक्त काहीही बोलले नाहीत. तसेच दिल्लीसाठी अमित शहा यांच्याकडे काही कल्पना असतील तर सांगाव्यात, आम्ही तुम्ही सुचवलेल्या कल्पना आगामी पाच वर्षात लागू करु असे केजरीवाल यांनी आपल्या ट्विट मधून प्रत्युत्तर दिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/