भाजपच्या डॉ. अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले. मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर येथील नेत्या डॉ. अर्चना पाटील या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थिती हा प्रवेश होणार असून हा कार्यक्रम बारामतीत होणार आहे.

डॉ. अर्चना पाटील या एमबीबीएस रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. तसंच त्यांच्या शिक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला सुशिक्षित चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. तसंच त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या तरूण नेतृत्वाचा पक्षाला फायदाच होईल असे सांगण्यात येत आहे. तसंच राष्ट्रावादीतून सतत होणाऱ्या आउट गोईंगनंतर पक्षात कोणाचा तरी प्रवेश होणे त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा उमेद जागी झाली असून नवीन उत्साह दिसत आहे.

इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावच्या पाटील घराण्याचा इंदापूर तालुक्यात मोठा प्रभाव आहे. दिनकरराव पाटील आणि शंकरराव पाटील हे तेथील राजकारणातील प्रसिद्ध नेते आहेत. दिनकरराव पाटील हे इंदापूर विधानसभेत शंकरराव पाटलांविरोधात उभे राहीले होते. तेव्हा त्यांच्यात अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती. तेव्हा दिनकराराव पाटील यांना अवघ्या पाचशे मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या या डॉ. अर्चना पाटील या दिनकरराव यांच्या नात आहेत.

आरोग्यविषयक वृत्त