भाजपचा मुस्लिम महिलांच्या मतांवर डोळा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – तिहेरी तलाक मुद्द्यावरून मुस्लिम समाजात उभी फूट पाडून महिलांची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने आता पुन्हा एकदा आगामी निवडणुका लक्षात घेऊन या मतांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गोरक्षा, कत्तलखाने किंवा अन्य धार्मिक मुद्द्यावरून मुस्लिम समाजातील पुरूषांना लक्ष्य करणाऱ्या भाजपने आता मुस्लिम महिलांना उद्योग व्यवसायात मदत करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील फडणवीस सरकारने मुस्लीम महिलांच्या बचतगटांना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या तुलनेत ४० पट अधिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

आगामी निवडणुकांच्या प्रचारात लाभार्थीकेंद्री मुद्यांवर भर देण्यात येणार आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागण्याआधीच आपली मते वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने नियोजनबद्धरीत्या मुस्लीम महिलांच्या मतांकडे लक्ष वळवले आहे. महाराष्ट्रातील मुस्लीम महिलांची मतपेढी आपल्याकडे वळवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. फेब्रुवारीमध्ये मुस्लीम महिलांचा अभ्यासवर्ग, मार्चमध्ये मुस्लीमबहुल भागांत संवाद यात्रेचे आयोजन असे कार्यक्रम घेण्यात आले. मुस्लीम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाक प्रथेला विरोध करत ती रद्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी भाजपने केला होता.

बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळनी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र 

२००६ ते २०१४ या काळात राज्यात अल्पसंख्याक महिलांचे १४८० बचत गट राज्यात उभे राहिले. त्यांना राज्य सरकारने एक कोटी ४५ लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले. गरिबीचे प्रमाण अधिक असलेल्या मुस्लीम समाजातील महिलांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळणे हा महत्त्वाचा विषय असल्याचे लक्षात घेऊन फडणवीस सरकारने या महिलांच्या बचत गटांना अधिक मदत करण्याचे धोरण स्वीकारले. गेल्या चार वर्षांत १९१२ बचत गटांना ५९.०५ टक्के कर्ज भाजप सरकारने दिले. फडणवीस सरकारने आता या माहितीचा तुलनात्मक लेखाजोखा तयार करत काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात मुस्लीम महिला बचत गटांना ४० पट जास्त मदत केल्याची माहिती मुस्लीम समाजातील महिला मतदारांपर्यंत पोहचवून निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे.