गुजरातमध्ये भाजपचाच दबदबा ; काँग्रेस पिछाडीवर

अहमदाबाद : पोलिसनामा ऑनलाईन : देशात लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याला विशेष महतव आहे. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुजरात ‘ होम पीच ‘ आहे. त्यामुळे सर्वांची नजर या राज्यावर आहे. गुजरात मधील निवडणुकीचे निकालही स्पष्ट होत आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या २६ जागा असून यात भाजप २४ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस केवळ २ जागांवर अडकली आहे.

गुजरातमध्ये गांधी नगर लोकसभा मतदार संघात भाजप अध्यक्ष अमित शाह १ लाख ८६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या अगोदर या मतदार संघातून जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ४८३१२१ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदार संघात हसमुखभाई सोमाभाई, अहमदाबाद पश्चिम मधून डॉ. कीर्ती सोळंकी आघाडीवर आहेत.

त्यासोबतच बारडोली, भरूच,अमरेली,भावनगर,छोटा उदयपूर, दाहोद, जामनगर, जुनागड, कच्छ, खेडा मेहसाणा,नवसारी पांचमहाल,पाटण,पोरबंदर, राजकोट, सांबारकाटा, सुरत, सुरेंद्र नगर , वडोदरा, वलसाड या ठिकाणीही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत