नागपूरात फडणवीस यांच्यासह भाजपाला मोठा धक्का ! पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी

नागपूर : पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. गेली ५८ वर्षेे येथून भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून येत होता. पण महाविकास आघाडीने भाजपाला घरात मोठा धक्का दिला आहे.

नागपूर पदवीधर निवडणुकीमध्य पाचव्या फेरीअखेर अभिजित वंजारी यांना ५५ हजार ९४७ मते मिळाली आहेत. भाजपचे संदीप जोशी यांना ४१ हजार ५४० मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा ६० हजार ७४७ मते इतका आहे. हा कोटा कोणीही पूर्ण करु शकले नसल्याने आता पसंती क्रमांक २ च्या मतांची मोजणी सुरु झाली आहे.

पहिल्या पसंतीच्या मतात वंजारी यांनी १४ हजार २०० मतांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी संदीप जोशी यांना तोडणे शक्य नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपाच्या हातातून नागपूर निसटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार वंजारी हे विजयी झाले आहेत.

अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, नितेश कराळे ६ हजार ८८९ मते मिळाली आहे.