भाजपाच्या ‘या’ 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

पोलिसनामा ऑनलाइन – बिहार विजयानंतर आता भाजप मिशन बंगालच्या जोरदार तयारीला लागला आहे. बंगाल निवडणुकीत भाजपने पाच विभाग तयार केले आहेत. निवडणुकीची जबाबदारी भाजपने पाच बडे नेत्यांवर सोपवली आहे.

कोणत्या विभागाची जबाबदारी कुणाकडे

सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागांची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी करतील. विनोद सोनकर बर्दमान आणि हरीश द्विवेदी यांना उत्तर बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत . भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आलं आहे. हे पाचही नेते नोव्हेंबर च्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीबाबत अहवाल सादर करून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर गृहमंत्री अमित शहा हे बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.

प्रभारी आणि सह प्रभारी

पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हेच असतील. बीजेपी अध्यक्ष नड्डा यांनी आयटी सेल असे अमित मालवीय यांना बंगालचे सर्व प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. येथे तृणमूल काँग्रेसचे सरकार असून ममता बॅनर्जी या राज्यांच्या मुख्यमंत्री आहेत.

सध्याचे राजकीय बलाबल

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक २११ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला ४४, डाव्यांना २६, भाजपला तीन जागा जिंकता आल्या होत्या आणि इतरांना १० जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण १४८ जागांची आवश्यकता आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उत्तर बंगालच्या एक महिन्याच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि नोकरशहांचे राजकारण केले जात आहे. असा आरोप धनखड यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे.