‘भाजपाचं गुजरात मॉडल…’ असं म्हणत राजीव सातव यांनी फोटो शेअर करत साधला PM मोदींवर ‘निशाणा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडलचं ब्रँडिंग करत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता खेचून आणली. याच मॉडेलचा आधार घेत गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे गुजरात मॉडेलवरून मोदींना सातत्याने काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येते. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मॉडेलचा उल्लेख करत टीका केली होती. आता पावसाळ्यात गुजरातमधील रस्त्यांची दूरवस्था पाहून गुजरातचे काँग्रेस प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ‘भाजपा का गुजरात मॉडेल’ असं कॅप्शन दिलंय. सातव यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी, काहींनी सातव यांना घरचा रस्ता दाखवला आहे. म्हणाले तुमच्या मतदारसंघातील रस्ते पहा, असा सल्लाही काही जणांना सातव यांना दिला आहे. काही जणांनी महाराष्ट्र मॉडेल पहा, अशी सूचना देखील केली आहे. तर काहींनी राजीव सात यांच्या फोटोला अनुसरून गुजरात मॉडेल फसवे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा चांगला विकास केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. या गुजरात मॉडेलचा आधार घेत त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. एवढेच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मोदींच्या गुजरात मॉडलेचे जाहीर सभांमधून कौतुक केले. मात्र नंतर हे गुजरात मॉडेल मला भासविण्यात आल्यंचही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.
भाजपा का गुजरात मॉडल pic.twitter.com/nD9pEFiKzK
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) August 26, 2020