पैशाच्या जोरावर काँग्रेसचे कार्यकर्ते उचलायची भाजपची कार्यपद्धती : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

प्रतिनिधी: शिल्पा माजगावकर

सांगली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा झालेला पराभव आपणाला मान्य आहे. शेवटी पराभव हा पराभवच असतो. पैशाच्या जोरावर काँग्रेसचे कार्यकर्ते उचलायची ही भाजपची कार्यपद्धती आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसंच ही कार्यपद्धती फार काळ टिकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbd801ab-9893-11e8-bb90-ddb19c7849a1′]

काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खाजगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकार वरती सडकून टीका केली आहे. प्रामुख्याने अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याबाबत खरपूस समाचार घेतला तसेच भाजपा सरकारने दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केलेली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा झालेला पराभव मान्य करत पराभव हा पराभवच आहे पण तो का झाला याची माहिती घेणं सध्या सुरू आहे परंतु पैशाच्या जोरावर काँग्रेसचे कार्यकर्ते उचलायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे अशी टीका करत ही फार काळ टिकत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

जानेवारी – फेब्रुवारी 2019 ला लोकसभा निवडणुका होण्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून जीएसटी नोटाबंदी हे सर्व फसल आहे. जर पुन्हा ही जोडगोळी निवडून आली तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आले असल्याची त्यांनी म्हटलं आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1842fbf-9893-11e8-8c2d-cd9fe8cfc5c2′]
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे हा प्रश्न ज्वलंत आहे परंतु हे सरकार आरक्षण देण्यात प्रामाणिक नाही त्यामुळे आश्वासन पूर्ण करता न आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी आणि हात मोकळे करावे असे देखील त्यांनी म्हटलंय.