पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन २५०’ ; ‘या’ दोन प्रमुख ‘रणनीती’वर काम ‘जोमात’ सुरु

कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे उत्साहित झालेला भारतीय जनता पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२१ ला विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.

भाजपचे लक्ष्य आता ही विधानसभा निवडणूक जिंकणे आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप दोन स्तरावर काम करत आहे. तृणमूल काँग्रेसचा जनाधार असलेले नेते भाजपमध्ये सामील करून घेणे आणि ग्राउंड पातळीवर संघटनेला मजबूत करणे या दोन प्रमुख रणनीतीवर भाजप काम करत आहे.

मिशन २५०

विधानसभेच्या २९४ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने ‘मिशन २५०’ लक्ष्य ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसला २२ जागा मिळाल्या आहेत. भाजपला तृणमूल काँग्रेस पेक्षा ४ जागा जास्त मिळाल्या असल्या तरी भाजपने बंगालमध्ये १८ जागा जिंकत ममतांच्या गडाला हादरा दिला आहे.

एका बाजूला तृणमूल काँग्रेस स्वतःला बंगालच्या अस्मितेशी जोडत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप स्वतःला बंगाली समाजाच्या हिताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय भाजपने या ठिकाणी नौकऱ्यांची निर्मिती, नागरी संशोधन विधेयक आणणे आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे देखील पक्षाला फायदा होऊ शकतो. हे मुद्दे राष्ट्रवाद, ओळख आणि दैनंदिन गरज या विषयाशी संबंधित आहेत.

लोकसभा निवडणुकीत मिळाले होते ४०.५ % मते

तृणमूल काँग्रेस भाजपच्या या तयारीला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. पश्चिम बंगालवर राज्य करण्याचे भाजपचे स्वप्न कधीही यशस्वी ठरणार नाही, असे तृणमूल काँग्रेस म्हणत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०.५ % मते मिळाली आहेत. बंगालच्या विधानसभेत भाजपच्या ६ जागा आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

उष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

जागतिक सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात

‘गाव तेथे मानसोपचार’ साठी डॉक्टरांची राज्यव्यापी मोहीम

डोकेदुखीकडे दुर्लक्ष ; जीवावर बेतले असते पण सुदैवाने वाचले प्राण