भूसूरुंग स्फोटाद्वारे भाजप आमदाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्याला कंठस्नान

दंतेवाडा : वृत्तसंस्था – मागील महिन्यामध्ये भाजप आमदार भीमा मांडवी यांचा भूसूरुंगाचा स्फोट करून हत्या केली होती. या घटनेमागचा मुख्य सुत्रधार मुया या नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. मुया याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. या स्फोटामध्ये आमदार मांडवी यांच्यासह वाहन चालक आणि तीन जवानांचा मृत्यू झाला होता.

आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबार केला होता. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार मुया याचा गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला.

दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी मुया ठार झाल्याची माहिती दिली. याची माहिती देताना पोलीस अधिक्षक पल्लव सांगितले, बुधवारी रात्री उशिरा जिल्हा राखीव दलाला मडकामीरास जंगलामध्ये नक्षली लपल्याची माहिती मिळाली होती.

यानुसार शोध घेताना नक्षल्यांची चकमक उडाली. यामध्ये मुया मारला गेला. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून घटनास्थळावरून रायफल आणि काडतुसे मिळाली आहे. तो अनेक नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता.

Loading...
You might also like