राम मंदिराबाबत भाजपची भूमिका दुटप्पी : प्रविण तोगडिया

मथुरा : वृत्तसंस्था

अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर भाजप नेते दुटप्पी भूमिका घेत असून त्यांना राम मंदिराचे आश्‍वासन पुर्ण करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, अशी टीका आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी केली. ते मथुरेत पत्रकारांशी बोलत होते.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3694fbe-b664-11e8-9590-11ca8935c42f’]

तोगडिया म्हणाले, जर मोदी तलाकवर संसदेत ठराव मांडू शकतात तर त्यांना अयोध्या प्रकरणात संसदेत ठराव करण्यात काय अडचण होती. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी हिंदुंना दिले पाहिजे. अनुसुचित जाती जमाती कायद्यावरून भाजप अडचणीत आल्यानंतर त्यांनी लगेच संसदेत ठराव करून स्वत:चा बचाव केला पण त्याचवेळी त्यांना राम मंदिर प्रकरणात कायदा करून हा प्रश्‍न सोडवला नाही. राम मंदिराच्या उभारणीचा विषय आता आम्हीच हाती घेणार आहोत. येत्या २१ ऑक्‍टोबर रोजी आमची संघटना अयोध्येच्या दिशेने एक मोर्चा काढणार आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0461a3ac-b665-11e8-8faa-0d2dc057822d’]

राफेल घोटाळ्याबाबत तोगडिया म्हणाले, मोदी सरकारच्या काळात राफेल विमानांच्या किंमती अचानक कशा वाढल्या याचाही खुलासा मोदी सरकारने केला पाहिजे. मोदींनी भाजपला कॉंग्रेसच्याच मार्गाने नेले आहे. भाजपमध्ये आज आयारामांची चलती आहे. कॉंग्रेसमधून अचानक भाजपमध्ये गेलेल्यांना सर्व सोयी सवलती भाजपमध्ये मिळत आहेत पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र दुर्लक्षित केले जात आहे.

काहीही झाले तरी आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार : अमित शाह 

गणेशोत्सव काळातील दारूबंदीला स्थगिती