शरद पवारांचा ‘बॉऊन्सर’ ! महाराष्ट्र सरकारबाबत सेना-भाजपला ‘विचारा’, राजकीय वर्तूळात प्रचंड ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार बनवण्याबाबत मोठं विधान केलं आहे. सरकार बनवण्याबात भाजप आणि शिवसेनेला विचारा. भाजप-सेनेला त्यांचा मार्ग निवडायचा आहे आणि आम्ही आमचे राजकारण करू असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. दिल्लीत ते बोलत होते. पवारांच्या अशा विधानाने गुगली टाकण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “सरकार बनवण्याबात भाजप आणि शिवसेनेला विचारा. भाजप-शिवसेना एकत्र लढले, आम्ही (राष्ट्रवादी) आणि कॉंग्रेस एकत्र लढलो. त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे आणि आम्ही आमचे राजकारण करू.”

राज्यातील सत्ताकोंडी अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. शरद पवार आज दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर राज्यातील सत्ता संघर्ष सुटेल अशा आशेनं या भेटीकडे पाहिले जात आहे. इतकेच नाही तर राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत महाशिवआघाडी स्थापन करताना दिसत आहेत. शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पवार आणि सोनिया गांधी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com