हैदराबाद महापालिकेत भाजपाची मुसंडी !

पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाने यंदा खंबीर नेतृत्व करणारे नेते प्रचारात उतरविले होते. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते. भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी टीआरएस १४ जागांवर आघाडीवर आहे.

पहिल्यांदाच भाजपाने ओवेसींच्या किल्यात पाय रोवण्यासाठी महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. ग्रेटर हैदराबाद नगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीत ११२२ उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. हैदराबादमध्ये १ डिसेंबरला मतदान झालं होतं. यावेळी ४६. ५५ टक्केच मतदान नोंदविलं गेलं . सत्ताधारी टीआरएस सर्वच्या सर्व १५० जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपा १४९ जागांवर निवडणूक लढवत आहे. एमआयएम ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे.

टीआरएसच्या नेत्या कविता यांनी सांगितले, की आम्ही १०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. भाजपाचे मोठमोठे नेते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. मला आनंद आहे की हैदराबादच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही व केसीआरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.

जाणून घ्या २०१६ चा निकाल
२०१६ मध्ये या पालिकेत टीआरएसला ९९, ओवेसींच्या एमआयएमला ४४ पैकी ५ आणि भापालाही ५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. हैदराबाद महानगरपालिकेत हैदराबाद, रंगारेड्डी, मेडचल-मल्काजगिरी आणि संगारेड्डी असे चार जिल्हे येतात. हैदराबाद देशातील मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. या पालिकाक्षेत्रात २४ विधानसभा आणि ५ लोकसभा मतदारसंघ आहेत.