शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा परांडा मतदारसंघातून विजय, राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचा दारुण पराभव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन परांडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी निवडणूकीच्या मैदानात राहुल मोटे यांचा 32,903 मतांनी पराभव केला. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांच्यात जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. या दोघांत मतदान मोजणीपासूनच चुरस पाहायला मिळाली. तानाजी सावंत यांनी मोठी ताकद पणाला लावली होती तर राहुल मोटे यांच्यासाठी देखील राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन केले होते.

या मतदारसंघात 64.37 टक्के मतदान झाले होते. परंतू तानाजी सावंत यांना दुपारी 4 च्या सुमारास 75,793 मते मिळाली होती तर राहुल मोटे यांना 52,328 मते मिळाली होती. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या विजय निश्चित मानला जात होता. वंचितचे सुर्यकांत कांबळे यांना देखील 21 हजार 984 मते मिळाली होती.

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत परांडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांनी 78 हजार 548 मतांनी विजय मिळवला होता. परांडा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे ज्ञानेश्वर पाटील होते. त्यांना 66 हजार 159 मते मिळाली, त्यांचा 12 हजार 389 मतांनी पराभव झाला. परांडा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर RSPS चे बाळासाहेब पाटील, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे नुरुद्दीन चौधरी आणि पाचव्या क्रमांकावर मनसेचे गणेश शेंडगे होते.

1. तानाजी जयवंत सावंत (शिवसेना) – 106674 मते (विजयी मतदार)
2. राहुल महारुद्र मोटे (राष्ट्रावादी) 73772 मते
3. महादेव शंकर लोखंडे (बहुजन समाज पार्टी) – 1093 मते
4. गुरुदास संभाजी कांबळे (बहुजन विकास आघाडी) 1009 मते
5. अ‍ॅड.रेवण विश्वंनाथ भोसले जनता दल (सेक्युलर) – 473 मते
6. सुर्यकांत (सुरेश भाऊ) चंद्रकांत कांबळे (वंचित बहुजन आघाडी) – 27939 मते
7. आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) 355 मते
8. पडघण नानासाहेब ज्ञानोबा (अपक्ष) 359 मते
9. बळीराम शंकरराव चेडे (अपक्ष) 503 मते
10. संकेत विक्रमराव चेडे (अपक्ष) 887 मते
11. NOTA – 1902 मते

Visit : Policenama.com