उद्या विधीमंडळात होणार्‍या ‘सुपर ओव्हर’मधील ‘फ्लोअर टेस्ट’साठी येडियुरप्पांची आमदारांसोबत ‘प्रॅक्टीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या सत्तेच्या खेळात आज सुप्रीम कोर्टात निर्णय होत असताना कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा हे कोणत्याही चिंतेत नव्हते. पक्षाच्या आमदारांसोबत ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते तिथे ते आमदारांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होते. त्यामुळे या निकालाची येडियुरप्पा यांना कोणतीही चिंता नव्हती असे दिसून येत होते. प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा हे आपल्या पक्षाचे आमदार रेणुकाचार्या आणि एसआर विश्वनाथ यांच्यासोबत क्रिकेट खेळले. या संदर्भातले काही फोटो बाहेर आले आहेत.

कर्नाटकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सत्ताकल्लोळ सुरु आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या १५ आमदारांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर या निकालाची कसलीही चिंता दिसत नव्हती. या १५ आमदारांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला असून दोन अपक्ष आमदारांनी देखील कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने आता सरकार संकटात सापडले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्याची संपूर्ण सूट ही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोर्टाने निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार घेतले असले तर उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी ते विधानसभेत यावेत कि नाही हा पूर्ण निर्णय त्यांचा असणार आहे. त्याचबरोबर या ठरावात सहभागी व्हायचे कि नाही याचादेखील पूर्ण निर्णय ते घेऊ शकतात. त्यामुळे आता कुमारस्वामी यांच्या सरकारवरचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे आता उद्या विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी यांचे सरकार वाचते कि कोसळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

Loading...
You might also like