बीएल संतोष यांची भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या संघटन महासचिवपदी बीएल संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएल संतोष यांची रामलाल यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. आरएसएसने एक दिवसापूर्वीच रामलाल यांना परत बोलावून घेतले होते. रामलाल यांची अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजयवाडा येथे संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर शनिवारी हा निर्णय घेण्यात आला.

संघटनमंत्र्याची जबाबदारी आता अन्य व्यक्तीकडे सोपवण्याची विनंती रामलाल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्राद्वारे केलेली होती. लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकीत भाजपला मोठे यशही मिळालेले आहे. त्यामुळे नव्या व्यक्तीकडे संघटनमंत्री पदाची जबाबदारी देता येऊ शकेल. परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे, असे रामलाल यांनी पत्रात नमूद केले होते. रामलाल २००६ पासून संघटनमंत्री होते.

रामलाल यांनी लिहलेल्या पत्रामध्ये आपले आता वय झाले आहे. त्यामुळे संबंधीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मला पदमुक्त करण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यांच्या पत्राची दखल घेत त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर बीएस संतोष यांची निवड करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

You might also like