Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

मॉस्को : Black death | कोरोनाला तोंड देत असलेल्या जगासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. रशियाच्या एक मोठ्या डॉक्टरने इशारा दिला आहे की, जर लोकांनी वाढते जागतिक तापमान कमी केले नाही तर जगात ब्युबॉनिक प्लेग (Bubonic Plague) चा धोका वाढेल. या आजाराने यापूर्वी सुद्धा संपूर्ण जगात लाखो लोकांचा बळी (Black death) घेतला आहे.

या जीवघेण्या आजाराने जगावर तीनवेळा हल्ला केला आहे. पहिल्यांदा 5 कोटी, दुसर्‍यांदा युरोपची एक तृतीयांश लोकसंख्या आणि तिसर्‍यांदा 80 हजार लोकांचा जीव घेतला होता. तिला ब्लॅक डेथ (Black Death) सुद्धा म्हटले जाते.

रशियाच्या डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी म्हटले की, ब्युबॉनिक प्लेग (Bubonic Plague) पुन्हा येण्याची शक्यता आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग सतत वाढत आहे. मागील काही वर्षात रशिया, चीन आणि अमेरिकेत ब्लॅक डेथची प्रकरणे समोर आली आहेत. डॉ. अन्ना पोपोवा यांनी म्हटले की, याचे भयानक रूप आफ्रीकेत पहायला मिळू शकते, कारण तिथे हा पसरण्याची शक्यता खूप जास्त आहे.

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत

डॉ. अन्ना पोपोवा यांनी म्हटले की, पर्यावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे जलवायु परिवर्तन होत आहे. जागतिक तापमान वाढत आहे. या कारणामुळे कमी होणारे आजार जसे ब्यूबोनिक प्लेग पुन्हा डोके बाहेर काढण्याची शक्यता आहे. ब्लॅक डेथची (Black death) प्रकरणे प्रत्येक वर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागात समोर येत आहेत. सातत्याने त्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. कारण हा आजार पसरवणार्‍या माशांमध्ये वाढ होत आहे.

ब्युबॉनिक प्लेग (Bubonic Plague) ज्या बॅक्टेरियामुळे होतो, त्याचे नाव यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा बॅक्टेरिया शरीराच्या लिंफ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसावर हल्ला करतो. याच्यामुळे बोटे काळी पडून सडू लागतात. नाकाच्या बाबतीत सुद्धा असेच होते. ब्यूबॉनिक प्लेगला गाठीचा प्लेग सुद्धा म्हणतात. यामध्ये शरीरात असह्य वेदना, जास्त ताप असतो. नाडी वेगाने चालते.

दोन-तीन दिवसात गाठ दिसू लागते.
14 दिवसात या गाठी पिकतात.
यानंतर शरीरात ज्या वेदना होतात त्या अंतहिन असतात.
ब्युबॉनिक प्लेग सर्वप्रथम जंगली उंदरांना होतो.
उंदीर मेल्यानंतर या प्लेगचे बॅक्टेरिया पिसवांद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करतात.
यानंतर जेव्हा पिसवा मनुष्याला चावतात तेव्हा त्या संसर्गजन्य द्रव मनुष्याच्या रक्तात सोडतात.
यानंतर मनुष्य संक्रमित होऊ लागतो.
उंदीर मरण्यास सुरूवात झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यानंतर माणसांमध्ये प्लेग पसरतो.

जगभरात ब्यूबोनिक प्लेगची 2010 ते 2015 च्या दरम्यान सुमारे 3248 प्रकरणे समोर आली आहेत. ज्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर्षांमध्ये बहुतांश प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, मॅडागास्कर, पेरू मध्ये आढळली होती. यापूर्वी 1970 पासून 1980 पर्यंत हा आजार चीन, भारत, रशिया, आफ्रीका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकन देशात आढळला आहे.

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांनी 12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हायकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Black Death | bubonic plague black death can comeback due to global warming

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update