संसर्ग : देशात महाराष्ट्रासह ‘या’ 11 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय ब्लॅक फंगस, जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाला पराभूत केल्यानंतर 14 ते 15 दिवसानंतर ब्लॅक फंगसची प्रकरणे दिसून येत आहेत. मात्र, काही रूग्णांमध्ये पॉझिटिव्ह होण्याच्या दरम्यान सुद्धा हा आढळून आला आहे. हा आजार केवळ त्यांनाच होतो ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. देशातील 11 राज्यांत हा पसरला आहे. कोण-कोणत्या राज्यात तो पसरला आहे आणि त्याची लक्षणे जाणून घेवूयात…

राज्य आणि म्यूकोरमाइकोसिसची स्थिती

गुजरात – 200 पेक्षा जास्त प्रकरणे
हरियाणा – अनेक प्रकरणे समोर आली
महाराष्ट्र – 52 लोकांचा मृत्यू 8 जणांचे डोळे काढले
दिल्ली – 160 रूग्ण सापडले
बिहार – 29 प्रकरणे समोर आली
ओडिसा – 10 मे रोजी पहिले प्रकरण समोर आले
तेलंगना – जवळपास 60 प्रकरणे समोर आली.
कर्नाटक – 38 प्रकरणे आढळली
राजस्थान – जयपुरमध्ये 14 पेक्षा जास्त प्रकरणे सापडली
मध्यप्रदेश – 50 प्रकरणे आढळली
केरल – अनेक प्रकरणे समोर आली

* म्यूकोरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस काय आहे ?
म्युकोरमायकोसिस एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे जे शरीरात खुप वेगाने पसरते. यास ब्लॅक फंगस सुद्धा म्हटले जाते. म्युकोरमायकोसिस इन्फेक्शन मेंदू, फुफ्फुसे किंवा त्वचेवर सुद्धा होऊ शकते. या आजाराने अनेक लोकांची दृष्टी जाते तर काही रूग्णांचा जबडा आणि नाकाचे हाड खराब होते. जर वेळी यास नियंत्रणात आणले नाही तर रूग्णांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

* जाणून घ्या लक्षणे

ही आहेत म्युकोरमायकोसिसची महत्वाची लक्षणे :

1 सर्वप्रथम चेहर्‍याच्या ठेवणीत बदल दिसू लागतो
2 काही संवेदनाक्षम लक्षणे आणि महत्वाच्या अवयवांचे नुकसान करू शकतात
3 भयंकर डोकेदुखी होणे
4 डोळ्यांची दृष्टी खराब होणे
5 गाल, डोळे आणि चेहर्‍यावर सूज
6 गालाच्या हाडांमध्ये वेदना आणि सूज येणे
7 चेहर्‍याच्या एका भागात वेदना होणे किंवा बधीरता येणे
8 संभ्रमाची स्थिती जाणवणे
9 नाकाच्या जवळपासची त्वचा काळी पडणे

* जास्त स्टेरॉईड दिल्याने ब्लॅक फंगसचा धोका
कोमोरबिडिटीज, व्हेरिकोनाजोल थेरेपी, अनियंत्रित डायबिटीज मेलिटस, स्टेरॉईड इम्युनिटी वाढवणे किंवा मोठ्या काळापर्यंत आयसीयूमध्ये राहणार्‍या लोकांना फंगल संसर्ग होण्याचा धोका असतो.