Black Fungus : डोळे-नाक-जबड्यावर ब्लॅक फंगसचा हल्ला; सरकारने सांगितली लक्षणे आणि बचावाचा उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ‘ब्लॅक फंगस’ या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही गमावू लागू शकते.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नागरिकांना ब्लॅक फंगसचे सुरुवातीची लक्षणे आणि ते कसे ओळखायचे याचा सल्ला दिला आहे. याची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यानुसार त्यांनी ट्विटरवर सांगितले, की जागरूकता आणि सुरुवातीची लक्षणे ओळखून या धोक्यापासून वाचता येऊ शकते.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते.

कोणाला याचा धोका जास्त?

‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नुसार, फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.

काय आहेत याची लक्षणे?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. त्यामुळे या लक्षणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कसा उद्भवतो हा आजार…

हा आजार खूपच कमी लोकांना होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे अशांना जास्त धोका आहे. जास्त प्रमाणात स्टेरॉईड घेणारे आणि ICU मध्ये जास्त दिवसांपर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो.

कसे वाचायचे यापासून?

‘ब्लॅक फंगस’पासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. बूट, लांब बाह्यांचे शर्ट, फुल पँट आणि हातमोजे घालून राहिले पाहिजे. तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

काय करू नये?

ब्लॅक फंगसपासून वाचण्यासाठी लक्षणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. बंद नाक झालेल्या सर्व प्रकरणात बॅक्टेरियल सायनसायटिस समजण्याची चूक करू नये. विशेष करून कोविड-19 आणि इम्युमोसप्रेशनचे प्रकरणात अशाप्रकारच्या चुका करू नये.