देशात वेगानं पसरतोय ब्लॅक फंगस, 7251 रूग्ण तर आतापर्यंत 219 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रासह ‘हे’ 10 राज्य प्रभावित, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस भारतात थैमान घालत आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ‘ब्लॅक फंगस’ या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. याच ब्लॅक फंगसचा प्रसार देशातील विविध राज्यांत झाल्याचे पाहिला मिळत आहे.

देशात म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस झपाट्याने पसरत आहे. देशातील विविध भागांत ब्लॅक फंगसमुळे आत्तापर्यंत 7251 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 219 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या आजाराचा वाढता धोका पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांना महामारी अधिनियम, 1897 अंतर्गत ब्लॅक फंगसला महामारी घोषित करावी, असे सांगितले आहे.

यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोक नायक, जीटीबी आणि राजीव गांधी या तीन सरकारी रुग्णालयांत ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान सरकारनेही यापूर्वीच ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. यासह अनेक राज्य सरकार अलर्टवर आहेत.

देशातील सर्वात प्रभावित राज्ये…

– महाराष्ट्र : राज्यात म्युकरमायकोसिसचे 1,500 प्रकरणे आहेत. यामध्ये 90 जणांचा मृत्यू.

– गुजरात : म्यूकरमायकोसिसचे 1,163 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 61 जणांचा मृत्यू

– मध्य प्रदेश : राज्यात म्यूकरमाइकोसिसचे 575 प्रकरणे 31 जणांचा मृत्यू.

– हरियाणा : हरियाणा राज्यात 268 प्रकरणे, ज्यामध्ये म्यूकरमायकोसिसमुळे 8 जणांचा मृत्यू.

– दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत म्यूकरमाइकोसिसचे 203 प्रकरणे, एका रुग्णाचा मृत्यू

– उत्तर प्रदेश : राज्यात म्यूकरमायकोसिसचे 169 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू

– बिहार : बिहारमध्ये आत्तापर्यंत 103 प्रकरणे समोर आली आहेत. त्यात 2 रुग्णांचा मृत्यू

– छत्तीसगड : 101 जणांना म्यूकरमाइकोसिसचा आजार. एकाचा मृत्यू

– कर्नाटक : या राज्यात म्यूकरमायकोसिसचे 97 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही.

– तेलंगणा : तेलंगणा राज्यात म्यूकरमाइकोसिसचे 90 प्रकरणे, 10 जणांचा मृत्यू.

एम्फोटेरिसिन बी औषधांची मागणी वाढली

म्यूकरमायकोसिसने संक्रमित रुग्णांना उपचारासाठी अँटी फंगल औषध ‘एम्फोटेरिसिन बी’ दिले जात आहे. या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या औषधांची खरेदी करण्याचा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.