Black Fungus | कोरोना रूग्णांसमोर एक मोठं सकंट बनलाय ‘ब्लॅक फंगस’, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Black Fungus |  कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही गमावू लागू शकते.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या आजाराची बाधा झाल्यानंतर रुग्णांच्या दृष्टीवर याचा परिणाम दिसतो. सध्या अनेक रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार करण्यासाठी स्पेशल वॉर्ड बनवण्यात आला आहे.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो.

कोणाला याचा धोका जास्त?

फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.

कोरोनाबाधितांचा जास्त धोका

म्युकोरमायकोसिसचे नवी प्रकरणे हे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांनाही याची बाधा होत असते.

काय आहेत याची लक्षणे?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते.

यावर उपाय काय?

ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झालेल्या निम्म्या लोकांचा यामध्ये मृत्यू होतो.
जर सुरुवातीलाच तुम्हाला या आजाराची माहिती मिळाली तर वेळेत उपचार घेतल्याने त्याचा फायदा होतो.
जर तुमचे डोळे, गालावर सूज अशाप्रकारचे लक्षणे दिसली तर बायोप्सीपासून इन्फेक्शनबाबत माहिती घेता येऊ शकते.
तसेच यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.

असे वाचा यापासून…

हा आजार खूपच कमी लोकांना होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे अशांना जास्त धोका आहे.
जास्त प्रमाणात स्टेरॉईड घेणारे आणि ICU मध्ये जास्त दिवसांपर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो.
यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
बूट, लांब बाह्यांचे शर्ट, फुल पँट आणि हातमोजे घालून राहिले पाहिजे. तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण