Black Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंगसचा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाची (Corona Infection) दुसरी लाट (Second Wave) कमजोर होताना दिसत असली तरी ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वेगाने वाढत आहे. ब्लॅक फंगसच्या धोक्याचा अंदाज यावरून येऊ शकतो की, देशाची आर्थिक राजधानी असलेेल्या मुंबईत तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. महाराष्ट्रात 4 ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा ब्लॅक फंगसच्या तक्रारी आल्या आहेत. मुलांमध्ये वेगाने वाढत असलेली ब्लॅक फंगसची प्रकरणे पाहिल्यानंतर डॉक्टरसुद्धा अस्वस्थ झाले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebookpage and Twitter forevery update

ब्लॅक फंगसच्या (Black Fungus) वाढत्या प्रकरणावर बोलताना फोर्टिस हास्पिटलचे सिनियर कन्सल्टंट-पीडियाट्रीशियन डॉ. जेसल शाह यांनी सांगितले की,
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात अनेक मुलांना संसर्ग झाला होता.
कोरोनातून बरे झालेल्या मुलांना आता ब्लॅक फंगस दिसून येत आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आलेल्या दोन मुलींमध्ये ब्लॅक फंगस आढळला.
त्यांचे डोळे काढावे लागले आहेत.

Chitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक

डॉक्टर शाह यांनी सांगितले की, ब्लॅक फंगस (Black Fungus) मुलींचे नाक, डोळे आणि सायनसमध्ये पसरला होता. सुदैवाने तो ब्रेनपर्यंत पोहचला नाही. सहा आठवडे मुलींवर उपचार केल्यानंतर अखेर आम्हाला त्यांचे डोळे काढावे लागले.
डोळे आणि कॅन्सर सर्जन डॉ. पृथेश शेट्टी यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मुलांवर सुद्धा ब्लॅक फंगसचा परिणाम दिसत आहे.
दोन्ही प्रकरणात मुलींचा एक-एक डोळा काढावा लागला.

अशाप्रकारे कोरोना व्हायरसने संक्रमित एका 14 वर्षाच्या आणि 16 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा ब्लॅक फंगस आढळला.
तपासणीत कोविडनंतर त्यांच्यात मधुमेहाची समस्या दिसून आली.
14 वर्षाच्या मुलीचा एक डोळा काढावा लागला तर 16 वर्षाच्या मुलीच्या पोटाच्या एका भागात ब्लॅक फंगस आढळला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebookpage and Twitter forevery update

Web title : black fungus threat increased in mumbai eyes removed of three children who suffering from mucormycosis in marathi

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित