जाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे

पोलिसनामा ऑनलाईन – द्राक्षांचे मुख्य दोन प्रकार आहेत. हिरवी आणि काळी द्राक्षं…यापैकी काळी द्राक्ष काळसर, जांभळ्या रंगाची असून चवीला अतिशय गोड असतात. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये द्राक्षांची लागवड केली जाते. द्राक्ष खाणं आरोग्यासाठी उत्तम असतं. याशिवाय यापासून फ्रूट सलाड, ज्युस, जॅम, आईस्क्रीम, जेली कँडी असे विविध प्रकार बनवतात. द्राक्षांपासून वाईन तयार केली जाते. द्राक्षं खाणं आरोग्याप्रमाणेच केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. द्राक्षं आरोग्यासाठी उत्तम असतात. कारण, द्राक्षात अनेक पोषक तत्त्वं आहेत.

दिडशे ग्रॅम द्राक्षात असलेले पोषक घटक :
कॅलरिज – 104 ग्रॅम
कार्ब्स – 27.3 ग्रॅम
प्रोटिन्स – 1.1 ग्रॅम
फॅट्स – 0.2 ग्रॅम
फायबर्स – 1.4 ग्रॅम
व्हिटॅमिन सी – 27 टक्के
व्हिटॅमिन के – 28 टक्के
व्हिटॅमिन बी 6 – 6 टक्के
पोटॅशिअम – 8 टक्के
कॉपर – 10 टक्के
मॅग्नेशिअम – 5 टक्के

काळी दाक्षे खाल्याने ह्रदयाचे संरक्षण होते. काही संशोधनानुसार काळी द्राक्षं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. काळ्या द्राक्षापासून तयार केलेली रेड वाईन प्रमाणात घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते अन् ह्रदयविकार होण्याचा धोका टाळतो. यामुळे पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कर्करोगचा धोका कमी होतो. मेंदूच्या कार्याला गती मिळते. मधुमेहाची समस्या टाळता येते. प्रतिकारशक्ती वाढते. हाडांची झीज भरून निघते. वजन कमी करणे सोपे जाते. बद्धकोष्ठतेवर परिणामकारक उपाय होतो. शरीराचा दाह नियंत्रणात येतो.

सौंदर्यावर होणारे फायदे :
काळी द्राक्षं खाल्याने एजिंगची समस्या कमी होते.काळ्या द्राक्षामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. चेहर्‍यावरील पिंपल्स कमी होतात. तसेच काळी द्राक्षं ही त्वचेसाठी उत्तम आहेत. त्वचा डिटॉक्स होण्याचा सर्वात जास्त मोठा फायदा हा होतो. त्वचेच्या सुरक्षेसाठी आणि त्वचेतील पेशींच्या पुर्नजीवनासाठी काळ्या द्राक्षामधील व्हिटॅमिन सी वरदान ठरतं. त्वचा सुंदर आणि तजेलदार राहण्यासाठी नियमित एक कप काळी द्राक्षे खाणं आवश्यक आहे. काळ्या द्राक्षांप्रमाणेच या व्हिटॅमिन सी युक्त फळांच्या ज्युसमुळे त्वचा चमकदार होते. त्वचेप्रमाणेच काळी द्राक्षं तुमच्या केसांसाठीदेखील उपयुक्त आहेत. केसांना पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात.

काळी द्राक्षं खाण्याबाबत काही प्रश्न :
काळी द्राक्षं खाण्याचे दुष्परिणाम आहेत का ?
कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच त्याचे फायदे शरीराला मिळत असतात. अगदी त्याचप्रमाणे काळी द्राक्षेदेखील प्रमाणात खावी. अतीप्रमाणात काळी द्राक्षे खाल्ल्यास पोटदुखी, जुलाब, डोकेदुखी, अपचन, गॅस, मळमळ, ओटीपोटात दुखणे, रक्ताच्या गुठळ्या होणे अशा अनेक आरोग्य समस्यां निर्माणही होऊ शकतात.

2. कोणत्या रंगाची द्राक्षे जास्त फायदेशीर ?
हिरवी आणि काळी दोन्ही प्रकारची द्राक्षे आरोग्यासाठी उत्तम आहेत. मात्र, काही संशोधनानुसार काळी द्राक्षे हिरव्या द्राक्षांपेक्षा जास्त फायदेशीर असतात.

3. दिवसभरात किती द्राक्षे खायला हवी ?
हिरवी अथवा काळी कोणतीही द्राक्षे अती प्रमाणात खाऊ नयेत. कारण, अती प्रमाणात द्राक्षे खाणं आरोग्यासाठी हितकारक नाही.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)