मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा डाव फसला 

मुंबई  : पोलीसनामा आॅनलाईन – भाजप सरकारचा निषेध करण्याच्या हेतूने दिवाळी सणानिमित्त मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी राजगुरू चौक येथून ताब्यात घेतले आहे. सदर दोघेही हे काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस विलास गंगावणे यांनी दिली. हे दोघेही नागपाडा येथे राहणारे असून झिशान सय्यद अहमद असे एकाचे नाव आहे. काँग्रेस (आय) पक्षाचा हा पदाधिकारी आहे.
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंत्रालयासमोर काळा कंदील लावून निषेध करण्यापूर्वीच दोघांना ताब्यात घेतले आणि मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला होणारी बाधा टळली आहे.
सत्तेत असूनही काम होतं नसल्याने ‘या’ आमदाराचे आमरण उपोषण
नांदेड : पोलीसनामा आॅनलाईन – राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपातील कुरघोडी नेहमीच सुरू असते. सत्तेत असूनही कामं होत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांवर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलीय. निवडणूका तोंडावर आल्या तरी अजूनही सत्तेत असणार की वेगळं लढणार यावरच चर्चा रंगल्या आहेत. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगावचे सेना आमदार नागेश पाटील अष्टीकर यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात सहाशेहून अधिक ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त आहेत.
दीडशे गावं अंधारात
हदगाव तालुक्यातच दीडशे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने दीडशे गावं अंधारात आहे. धक्कदायक म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. याबाबत ऊर्जामंत्र्यांपासून सर्व स्तरापर्यंत पाठपुरावा करूनही कुणीच दखल न घेतल्याने उपोषणावर बसल्याचे अष्टीकर यांनी सांगितलंय.
दुरूस्ती सुरू 
त्यांच्यासह शिवसेना आमदार सुभाष साबने आणि आमदार हेमंत पाटील यांनीही उपोषणाला बसत सरकारच्या गलथान कारभाराचा निषेध केलाय. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचं मान्य करत २०० ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्ती सुरु असल्याचे महावितरणनं म्हटलं आहे.