व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पेंट आणि मोबाईल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडे दरमहा दोन लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्या युवकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान विमाननगर येथील दोराबजी मॉल शेजारी आणि व्यापाऱ्याच्या वडगाव शेरी येथील घराजवळ घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b2ae93a-c24a-11e8-ab00-2120485813ab’]

जितेंद्र अशोक भोसले (वय-३४ रा. बंगला नं.३, दोराबजी मॉल शेजारी, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात भर उन्हात पूर परिस्थिती , पाहणीसाठी आलेल्या महापौरांना घेराव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचा पेंट व मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे विमाननगर येथे ऑफिस आहे. विमाननगर भागातील बांधकाम व्यावसायिकांना ते पेंटची विक्री करतात. आरोपी जितेंद्र याचे देखील विमाननगर परिसरात ऑफिस आहे. फिर्यादी यांनी विमाननगर परिसरात पेंटची विक्री करताना त्याची परवानगी घ्यावी तसेच परवानगी शिवाय पेंटची विक्री करुन नये अशी धमकी आरोपीने दिली होती. तसेच पेंटची विक्री करावयाची असल्यास दरमहा दोन लाख रुपयांचा हप्ता मागितला.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’962198e2-c24b-11e8-ae14-152d14cb91a2′]

हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. आरोपीच्या धमकीला घाबरुन फिर्यादी यांनी फेब्रुवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान दहा लाख रुपयांची रक्कम खंडणी स्वरुपात आरोपीला दिली. मात्र, आरोपीने दहा लाख रुपये घेऊन ही पुन्हा दरमहा दोन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी जितेंद्र भोसले विरोधात विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने करुन आरोपीला बेड्या ठोकल्या. पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करीत आहेत. 

सातारा ठरला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा

 

धनकवडीतून युवकाचे अपहरण

धनकवडी येथील केके मार्केट येथून सुभाष गोवर्धन राठोड (वय- ३८) याचे दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.२३) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सुभाष राठोड याचा टेम्पो चालवण्याचा व्यवसाय आहे. रविवारी दोन अज्ञात व्यक्तींनी हिंजवडी येथे जायचे असल्याचे सांगून सुभाषला घेऊन जाऊन त्याचे अपहरण केले. याप्रकरणी सुभाषचा लहान भाऊ राजु राठोड (वय -२२) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुभाष राठोड याला सहा महिन्यांपूर्वी चार जणांनी शेतीच्या वादातून घेऊन गेले होते. या चार व्यक्तींनीच सुभाषचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

आज मध्यरात्रीपासून विमान प्रवास, एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज महागणार

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3242fef7-c24a-11e8-85dd-ffc96f58ed6e’]