Black Money | मोदींंच्या काळात स्वीस बँकेत भारतातून 286 % जास्त रक्कम जमा; काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा चर्चेत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Black Money |भारतीयांकडून स्वीस बँकेत (Swiss bank) जमा केल्या जात असलेल्या पैशात एका वर्षात 286 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याने काळ्या पैशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरून कॉंग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला (Congress leader Randeep Surjewala) यांनी मोदी सरकारवर (Modi government) टीका केली आहे. स्वीस बँकेत 20,700 कोटी जमा झाले आहेत. सीआरआय वर्ष 2019-2020 दरम्यान त्यात 286 टक्के वाढ झाली. गेल्या 13 वर्षांत स्वीस बँकेत सगळ्यात जास्त पैसा. मोदी जी उत्तर द्या. काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले? आता तर 7 वर्षे झाली. इच्छाशक्ती नाही की पैसा मित्रांचा आहे? अशी विचारणा केली आहे. Black Money | 286 higher deposits swiss banks india congress demands release white paper
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

2020 मध्ये 2019 च्या तुलनेत भारतीयांनी जो पैसा ठेवला. तो 286 टक्के झाला. तो गेल्या 13 वर्षातील सर्वांत जास्त रक्कम आहे. किती आहे, कोणकोणत्या खात्यांत, कोणाची आहे याचा माहिती (डाटा) बँकेकडे आहे. त्याचा काही उल्लेख बॅंकेच्या वार्षिक अहवालातही आहे. स्वीस बँकेचे आकडे सांगतात की, स्वीस बँकेची 2019 मध्ये भारतीयांबद्दल जी लायबिलिटी होती ती एकूण 892 दशलक्ष स्वीस फ्रॅकची. ती 2020 मध्ये वाढून 2553 दशलक्ष स्वीस फ्रॅक झाली. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 7,200 कोटी रुपयांनी वाढून 20,706 कोटी रुपये जमा झाले आहेत.

श्वेतपत्रिका जारी करा

याबाबत काॅंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी. हा पैसा का वाढला? विशेषत: या संकटाच्या दिवसात. ज्यांचा पैसा वाढला? ते लोक कोण आहेत? पैसा कसा वाढला? हा पैसा आम्ही भारतात परत आणू शकू? याबाबत देशाच्या जनतेसमोर श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी वल्लभ यांनी केली आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  Black Money | 286 higher deposits swiss banks india congress demands release white paper

हे देखील वाचा

Big Breaking News

पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात ‘झूम बराबर झूम’ जोमात; पत्त्याच्या ‘क्लब’ आणि
‘मटका’ अड्ड्यावर गुन्हे शाखेचे रेड; 72 जणांवर कारवाई !

नेमकं काय आहे प्रकरण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आता अवैध धंद्यांना
पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का ?

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का?