‘ब्लॅक मून’चा योग 30 ऑगस्टला, होणार ‘हे’ परिणाम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशवासियांना लवकरच ‘ब्लॅक मून’चा योग अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी भारतीयांना हि संधी मिळणार असून या दिवशी चंद्र पूर्णपणे काळ्या रंगाचा असणार आहे. याआधी आपण ‘ब्लड मून’, ‘सुपर मून’, ‘ब्ल्यू मून’ असे अनेक शब्द ऐकले असतील. मात्र ब्लॅक मून हि संकल्पना पहिल्यांदाच ऐकण्यास मिळत असून अमावास्याच्या दिवशी चंद्राचे असे रूप देशवासियांना पाहायला मिळणार आहे.

एका महिन्यात साधारणतः दोन अमावास्या असतात. त्यामुळे महिन्यातील दुसऱ्या अमावास्याले काळा चंद्र म्हणायची प्रथा आहे. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आणि दोन अमावास्या येतात. त्यामुळे साधारणतः पंधरा दिवसांच्या अंतराने यांचा कालावधी असतो. जर महिन्यात दुसरी अमावास्या आली तर तिला ब्लॅक मून म्हटले जाते आणि दुसरी पौर्णिमा आली तर तिला ब्लु मून म्हटले जाते. मात्र संशोधकांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले आहे कि, ब्लॅक मून म्हणजे चंद्र काळा होणार नसून या कालावधीत सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागे असतो. अंधारी बाजू पृथ्वीकडे असते. त्यामुळे आपल्याला चंद्र काळा दिसतो. यासंबंधी अमरावती येथील मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

नवीन प्रथा
ब्लॅक मून हि संकल्पना नवीन उदयास आली असून यामुळे वेगवेगळ्या अफवा देखील समाजात पसरवल्या जात आहेत. यामुळे मानवी जीवनात काहीही परिणाम होत नसून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे. यापूर्वी देखील हा योग्य 2014 आणि 2016 मध्ये आला होता. त्यानंतर आता हा योग्य 2018 नंतर पुन्हा 2022 मध्ये येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –