कार्यकारी अभियंत्याच्या अंगावर काळे ऑईल ओतले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक धक्‍कादायक प्रकार घडला आहे. बांधकाम सहाय्यक आणि स्विपरने चक्‍क विद्यापीठाच्या इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर.व्ही. पाटील यांच्या अंगावर काळे ऑईल ओतले. ही घटना गुरूवारी सकाळी 11 वाजता घडली. त्यानंतर पाटील यांना चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते मात्र तेथून परत विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी नेण्यात आले.

पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकाचा कोयत्याने सपासप वार करून खुन 

बांधकाम सहाय्यक अभिजीत साठे आणि स्विपर नितीन प्रसाद या दोघांनी कामाच्या वादातुन पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतले आहे. त्यांनी पाटील यांना मारायला मोठा दगड देखील आणला होता. मात्र, पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतल्यानंतर परिसरातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. त्यामुळे मोठा अर्नथ टळला. विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गर्दी केली. तसेच पाटील यांना ससून रूग्णालयात नेण्यास विरोध दर्शविला.

कुलगुरूंना भेटल्याशिवाय पाटील यांना ससूनला नेवु देणार नाही असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतल्यानंतर पाटील यांना विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी पाठविण्यात आले. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील अधिकारी प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. मात्र, नेमका काय वाद झाला हे पोलिसांना समजलेले नाही.