कर्नाटकच्या जंगलात आढळला ब्लॅक पँथर, छायाचित्रं पाहून लोक ‘हैराण’

हुबळी : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक काळा चित्ता म्हणजेच ब्लॅक पँथरची काही आकर्षक छायाचित्रे वायरल होत आहेत. ज्यामध्ये हा ब्लॅक पँथर कर्नाटकच्या जंगलातून फिरताना दिसत आहे. त्याला पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे.

ट्विटर अकाऊंट अ‍ॅट अर्थ हँडलवरून ही छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. याच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, भारतात काबिनीच्या जंगलात फिरणारा एक काळा चित्ता.

छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा चित्ता बिनधास्तपणे जंगलात फिरत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार ही छायाचित्रे वन्यजीव फोटोग्राफर शाज जंग यांच्या कॅमेर्‍यात कैद झाली आहेत.

काबिनीच्या जंगलात फिरणार्‍या या ब्लॅक पँथरची छायाचित्रे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. सोशल मीडियावर कुणी यास किंग म्हणत आहे तर कुणाला बघीराची आठवण येत आहे.

सध्या ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत.