
Black Tea Health Benefits | ब्लॅक टी प्यायल्याने कमी होतो मृत्यूचा धोका! सिगारेट ओढणार्यांचे चहाशी विशेष ’कनेक्शन’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Black Tea Health Benefits | जगातील कोट्यवधी लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. पाण्यानंतर चहा हे सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय आहे. लोकांना त्यांच्या आवडीनुसार चहा बनवायला आवडतो. काहींना दुधाचा चहा (Milk Tea) तर काहींना ग्रीन टी किंवा ब्लॅक टी (Green Tea, Black Tea) आवडतो. दुधाचा चहा भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. तुम्ही जर चहा पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात काळ्या चहाच्या फायद्यांबद्दल बरेच काही समोर आले आहे. यामध्ये ब्लॅक टी आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Black Tea Health Benefits)
’ब्लॅक टी’मुळे कमी होतो मृत्यूचा धोका
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, ब्लॅक टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की दररोज 2 कप ब्लॅक टीचे सेवन केल्यास मृत्यूचा धोका 12 टक्क्यांनी कमी होतो. तो हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक टाळण्यास मदत करतो. विशेष म्हणजे दुध मिसळलेला चहा देखील फायदेशीर आहे आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी उपयुक्त ठरतो. अभ्यासात असे स्पष्टपणे म्हटले आहे की दररोज 2 कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तो ठराविक प्रमाणात सेवन केला पाहिजे. (Black Tea Health Benefits)
धूम्रपान करणारे जास्त पितात चहा
चहा आणि धूम्रपानाबाबत केलेल्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये असे आढळून आले आहे की धूम्रपान (Smoking) करणार्या लोकांमध्ये चहाचे सेवन जास्त होते. मात्र, अशा लोकांचे आरोग्य बिघडते. आपल्या सर्वांना माहित आहे की कोणतीही गोष्ट जास्त खाणे किंवा पिणे याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने अनेक आजार होऊ शकतात. यासोबतच जास्त चहा पिणे देखील हानिकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ब्लॅक टी प्रभावी
ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट्स सारखी बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात.
आतापर्यंत, अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की पॉलिफेनॉलने समृद्ध असलेल्या गोष्टी उच्च रक्तदाब,
टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी करू शकतात.
याशिवाय अशी संयुगे अनेक पदार्थांमध्ये आढळतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही अशा पदार्थांचे सेवन सुरू करू शकता. मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गोड चहा पिऊ नये.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Black Tea Health Benefits | drinking two cups of black tea a day lower mortality risk it lead to longer life
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
High Cholesterol ची शत्रू आहे ‘ही’ हिरवी डाळ, भिजवून खाल्ल्याने होतील जबरदस्त फायदे
Sudden Stop Drinking | काय होते जेव्हा तुम्ही अचानक दारू पिणे बंद करता? जाणून घ्या
Mustard Oil Price | मोहरीच्या तेलात झाली घसरण, लोकांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर