‘ब्लॅक टी’ आणि Black Coffee मध्ये जास्त फायदेशीर काय ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – काही लोकांना ब्लॅक टी आवडतो कर काहींना ब्लॅक कॉफी आवडते. परंतु यातील काय नेमकं काय चांगलं आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

ब्लॅक टीचे फायदे
हिवाळ्यात तुम्हाला गरम ठेवते.
शरीराला भरपूर अँटी ऑक्सिडेंट्स मिळतात.
इम्युनिटी बूस्ट होते.
ब्लॅक टीमध्ये पॉलिफेनॉल्स असतात जे तुमच्या सिस्टीमध्ये केमिकल्स जाण्यापासून रोखणारे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. पॉलिफेनॉल्स प्लाक तयार करणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमचा बचाव करतात. यामुळं तुमची हाडं मजबूत होतात.
ओवेरियन कॅन्सरपासून बचाव होतो.
यात असणाऱ्या टॅनिन्समुळं इम्युनिटी चांगले राहते आणि इंटेस्टाईन मजबूत होतात.
चहात कॉफीच्या तुलनेत 50 टक्केच कॅफीन असतं.

जीमला जाणारी लोकं जास्त करून ब्लॅक कॉफी घेतात. परंतु ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी नुकसानदायी मानली जाते. परंतु प्रमाणात सेवन असेल तर याचेही फायदे होतात.

ब्लॅक कॉफीचे फायदे
ब्लॅक कॉफीच्या सेवनानं आयुष्य वाढतं असा दावा केला जातो.
यातही अनेक अँटी ऑक्सिडेंट्स असतात.
यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं.
ब्लॅक कॉफी प्रकिन्सस डिजीज, बेसल सेल कार्सिनोमा आणि ऐल्टशाईमर्स आणि डायबिटीजपासून बचाव करते.
पुरुषांचा प्रोस्टेट कॅन्सपासून बचाव होतो
महिला एंड्रोमेट्रीअल कॅन्सरपासून दूर राहतात.

काय आहे फायदेशीर ?

तसं पाहिलं तर दोन्हींचे फायदे हे वेगवेगळे आहेत. त्यामुळं तुम्हाला जसे फायदे हवे आहेत तसं तुम्ही काय सेवन करावं याची निवड करू शकता. कॉफीत दुप्पट कॅफीन असतं. जर तुम्हाला झोप उडवायची असेल तर तुम्ही कॉफीचं सेवन करू शकता. दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल तर चहाची निवड करू शकता.