एकेकाळी लोकप्रिय असणारे ‘ब्लॅकबेरी मेसेंजर’ होणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी १९ कोटींहून अधिक युजर्स असणारी ब्लॅकबेरी मॅसेंजर येत्या ३१ मेपासून बंद होणार आहे. सध्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा तसेच ब्लॅकबेरी व्यासपीठावर ग्राहकांना टिकवून ठेवण्यात कंपनीला आलेले अपयश या कारणांमुळे ही सेवा बंद करावी लागत असल्याची माहिती ब्लॅकबेरीची मालक कंपनी एम्टेकतर्फे देण्यात आली आहे.

https://twitter.com/BBM/status/1118854212362940416

ब्लॅकबेरी मेसेंजर जगभरात लोकप्रिय होता. ब्लॅकबेरी’ आणि ‘बीबीएम’ हे काही दिवसांपर्यंत एक ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले होते. ईमेल आणि मॅसेजिंगसाठी हे फोन सोईचे ठरत होते. आता मात्र ब्लॅकबेरीला उतरती कळा लागली आहे. व्हॉट्सअपच्या वाढत्या वापरामुळे मागे पडल्यामुळे ब्लॅकबेरी मॅसेंजर (बीबीएम) बंद करण्यात येणार आहे.

या मेससेंजरमधील माहितीच्या गोपनीयता तसेच गैरवापराची शक्यता नसल्याने या सेवेकडे विश्वासार्हतेने पहिले जायचे. ब्लॅकबेरी मेसेंजर बंद होत असले तरी ब्लॅकबेरी मेसेंजरची एंटरप्राइज आवृत्ती यापुढे सुरु राहणार आहे. सध्या ही एंटरप्राइज आवृत्ती गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून येत्या काही दिवसात अ‍ॅपल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध होत आहे.