सैफ अली खान, सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे

जोधपूर : वृत्तसंस्था

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. राजस्थान राज्यशासनाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देणार असल्याचे संकेत दिले आहेत. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

चित्रपट ‘हम साथ साथ है’च्या चित्रिकरणादरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर १९९८ च्या कालावधीत सलमानसह इतर कलाकारांवरही काळवीट शिकार प्रकरणी आरोप होते. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर काळवीटच्या शिकारीसाठी सलमानला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.मात्र त्यांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आलं होतं. त्याच विरोधात या निर्णयाच्या सुनावणीला जवळपास पाच महिन्यांचा काळ लोटल्यानंतर राज्यशासनाकडून आवाहन देण्यात आलं आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5e985d1-b8e6-11e8-94f3-0b8e16a9489d’]
काळवीटांची काळजी घेणाऱ्या बिश्नोई समाजानं सलमानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवत त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.तेव्हा आता या प्रकरणी पुढे कोणता निर्णय देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.