धक्कादायक ! औरंगाबादमध्ये पार्टीसाठी ‘काळवीटा’ची शिकार, फोटो व्हायरल झाल्याने प्रकार उघडकीस

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना देखील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काळवीटाची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. काळवीटाची शिकार करून पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे वन्य प्राणी वाचवण्याची मोहिम राबवली जात असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच काळवीटाची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतागाव शिवारातील हा प्रकार आहे. काळवीटाचे एक पिल्लू शेतात आले असता काही युवकांनी त्याला पकडून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मटणाची पार्टी या युवकांनी केली. दरम्यान, काळवीटाच्या पिल्लाला झोपडीत नेताना आणि त्या ठिकाणी त्याची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिसरात हिरवळ असल्याने आणि परिसरातील पाणी साठी कमी झाल्याने हे पिल्लू कळपापासून भरकटले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काळवीटाच्या शिकारीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि प्राणी मित्रांनी हळहळ व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. वन्य जीव कायद्यानुसार कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे. वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांची नासधुस होत असल्याने त्यांची शिकार केली जाते हा युक्तीवाद ग्राह्य धरला जात नाही. मात्र, व्हायरल झालेल्या फोटोवरून युवकांनी मटणाची पार्टी करण्यासाठीच काळवीटाच्या पिल्लाची शिकार केल्याचे फोटोवरून स्पष्ट होत असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like