ब्लॅकमेल करत असल्यामुळे प्रेयसीचा केला खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात असताना त्याचे वडिल ठेकेदार आहेत, तेही मुंबईत हे समजल्यानंतर ते चांगले मालदार असणार असे समजून तिने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिच्या या मागण्याला कंटाळून शेवटी त्याने तिचा गळा दाबून खुन केला व मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला होता.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अरुण साहेबराव पवार (वय २८, रा. मुंबई) या विद्यार्थ्याला अटक केली आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील शिवनेरी अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. सुन्मया गणेश तमांग (वय ३५, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cdc7819-a8f7-11e8-a5f9-b9730aa54a45′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुन्मया तमांग मूळची नेपाळची आहे. अनेक वर्षांपासून ती राज्यात वास्तव्यास होती. तिचा विवाह झाला होता. पतीसोबत ती मुंबई येथे राहत होती. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहत आहे. सुन्मया चार वर्षांपूर्वी भांडूपमध्ये वेश्या व्यवसाय करत होती. त्या वेळी अरुणची आणि तिची ओळख झाली. अरुण ‘बीएएमएस’चा विद्यार्थी असून, पुण्यातील एका महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत आहे. अरुण शिक्षणासाठी पुण्यात आला होता. गेले दोन वर्षे ते लव इन रिलेशन्स मध्ये रहात होते. त्याचे वडिल मुंबईत ठेकेदार आहेत. अरुणपासून सुन्मया गर्भवती राहिली होती. त्याच्या वडिलांविषयी तिला माहिती असल्याने त्यांच्याकडून चांगला पैसा काढता येईल,  या हेतून सुन्मया हिने अरुणकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर बदनामी करण्याची धमकी देऊ लागली. त्यावरुन दोघांत वाद होऊ लागले. २३ आॅगस्टला मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी अरुणने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पहाटे तीन वाजता मृतदेह सोसायटीतील पाण्याच्या टाकीत टाकला.

सोसायटीतील टाकीतील पाणी संपले असल्याने शनिवारी दुपारी पाण्याचा टँकर बोलविण्यात आला होता. पाणी चढविण्यासाठी सोसायटीच्या सदस्याने टाकीचे झाकण उघडले असताना त्यांना आत दोन पाय तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना त्याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. सोसायटीतील रहिवाशांकडे केलेल्या चौकशीत या दोघांविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी अरुण पवार याला अटक केली आहे.