धायरी येथील ‘तो’ स्फोट पुर्ववैमनस्यातून

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

पुण्यातील धायरी येथील डीएसके रोड वरील अलोक पार्क सोसायटीत बुधवारी पहाटे तीन वाजता अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी मोठी होती की, सोसायटीतील एका घराची काच तुटली होती. या गूढ आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. हा आवाज फट्याकांचा असेल असा प्राथमिक अंदाज  वर्तवण्यात आला होता. पण पोलिसांनी याघटनेचा अधिक तपास केला असता त्यांना या परिसरात बॉल बेअरिंगचे तुकडे सापडले आहेत.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eda1cf40-9b30-11e8-b751-15e5c931b885′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धायरी येथील डिएसके रोडवरील आलोक पार्क सोसायटीमध्ये बुधवारी पहाटे स्फोटाचा आवाज झाला. फटाक्यांसारख्या झालेल्या मोठ्या आवाजाने एका घराची काच फुटली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेबाबत सोसायटी आणि परिसरात कसून शोध घेतला. तेव्हा बॉल बेरिंगचे तुकडे परिसरात सापडले. बॉल बेअरिंग स्फोटकांमध्ये वापरण्यात येते. या सोसायटीत फक्त एकाच घराच्या खिडकीची काच फुटल्यामुळे हा प्रकार कोणीतरी जाणून बुजून केला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान हा प्रकार बॉम्ब स्फोटाचा  नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी पहाटे तिनच्या  सुमारास वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हे स्फोटक फेकल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हे कृत्य कोणी केले आहे याचा तपास सुरु आहे असे सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले .