पंजाब : फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट, 19 मृत्युमुखी तर अनेक जखमी

गुरुदासपूर – वृत्तसंस्था – पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 19 लोकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. स्फोट अतिशय मोठा असल्यामुळे अनेक लोक स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. तसेच इमारतीत आणखीही 50 जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयातील बाटला येथे असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात झाला आहे. त्यामध्ये सुमारे 19 लोकांना प्राण गमवावा लागला आहे. जवळ-जवळ 30-40 लोक जखमी अवस्थेत आहेत. या स्फोटाचा आवाजच इतका मोठा होता की, त्यामुळे आजूबाजूंच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्फोटाची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तात्काळ बचावकार्य सुरू झाले. तसेच भटिंडा एनडीआरएफ हेडक्वार्टर कडून मिळालेल्या माहितीनुसार, नूरपूर, लडोवालहून एनडीआरएफच्या 2 टीम बाटलाकडे रवाना झाल्या आहेत. फटाक्याच्या फॅक्टरी मध्ये स्फोट नेमका सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. स्फोटामध्ये पूर्ण फॅक्टरी जाळून खाक झाली आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामध्ये जवळ जवळ 50 मजूर गायब आहेत. ते ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुद्धा स्फोटाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, डीसी, एसएसपी यांच्या निगराणीखाली मदतकार्य सुरु आहे.

खासदार सनी देओल ने व्यक्त केले दुःख
स्फोटाची माहिती मिळताच गुरदापूरचे खासदार सनी देओल ने एक ट्विट व्यक्त करून दुःख व्यक्त केले. त्याने ट्विट मध्ये लिहिले आहे की, बाटला मध्ये फटाक्याच्या फॅक्टरी मध्ये झालेल्या स्फोटाची बातमी ऐकून दुःख झाले. एनडीआरएफ ची टीम आणि स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे. बाटला हॉस्पिटल कडून हा 01871240144 हेल्पलाईन नंबर जाहीर केला गेला आहे.

हा तर सरकारवरच हल्ला
माजी कॅबिनेट मंत्री विक्रम मजिठिया यांनी बाटला फॅक्टरी मध्ये झालेल्या स्फोटात दोषी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ज्यांना प्राण गमवावे लागेल आहेत त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. पुढे त्यांनी पंजाब सरकारला प्रश्न विचारला की, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी फटाक्याची फॅक्टरी कशी काय चालू शकते..? तेथील डीसीला याबाबत काही माहिती नव्हती का..? अधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय असे काम कसे काय चालू होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना नंतरही अशा प्रकारची फॅक्टरी कशी काय चालू होती.? हे सरकार अस्तित्वात असताना यापूर्वीही अनके ठिकाणी असेच प्रकार घडत आहेत. त्यामुळे हा सरकारवरच हल्ला आहे असे मजिठिया म्हणाले. बाटला हॉस्पिटल कडून हा 01871240144 हेल्पलाईन नंबर जाहीर केला गेला आहे. लोकांना सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –