भरूच येथील केमिकल कंपनीत 2 स्फोट; 24 कर्मचारी जखमी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी यूपीएल-५ प्लांटमध्ये सोमवारी रात्री २ स्फोट झाले.यामध्ये २ कर्मचारी जखमी झाले आहेत.
घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्याना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सीएम नावाच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला असून स्फोट इतका मोठा होती की त्याचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटामुळे परिसरातील गावांमध्ये भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि लोक घरातून बाहेर पडले. स्फोटाचे कारण अस्पष्ट असून २४ जखमींवर भरूच आणि बडोदामधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हा स्फोट इतका मोठा होता की त्याच्या आवाजाने यूपीएल कंपनीजवळ असलेल्या दढेडा, फुलवाडी आणि करलसाठी गावांमधील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे समजते. दरम्यान, गेल्या वर्षीही असाच स्फोट झाला होता. भरूचमधील पटेल ग्रुपच्या केमिकल फॅक्टरीत जून महिन्यात स्फोट झाला होता. स्टोरेज टँकमध्ये हा स्फोट झाला होता. यात १० जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास ७७ लोक जखमी झाले होते.