‘पंजाब’ मधील स्फोटानंतर पोलिसांचा ‘यूटर्न’, स्फोटात 2 जणांचा ‘मृत्यू’ झाल्याचं केलं ‘स्पष्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमधील तरनतारनमध्ये बाबा दीपसिंहजी यांच्या जन्मदिनी आयोजित कार्यक्रमात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याआधी स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी सांगितले होते की या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आता वेगळीच आकडेवारी समोर आली आहे. नगर किर्तनाच्या या कार्यक्रमात स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती. परंतु अद्यापही स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी आतिषबाजी होत असताना रसायनांमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोट झाल्याचा ठिकामी मदतकार्य सुरु आहे. या स्फोटात 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरनतारन हा जिल्हा भारत पाकिस्तान सीमेवर आहे. स्फोटत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपाचारासाठी हालवण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण होता की मृत्यूमुखी पडलेल्यांचे अवशेष सर्वत्र उडाले.

यापूर्वी देखील झाले होते स्फोट –
यापूर्वी अमृतसरमध्ये 2018 साली निरंकारी भवनात हल्ला झाला होता. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर बरेच जण जखमी झाले होते.या हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आले होते. तरनतारन जिल्ह्यात 2019 साली देखील स्फोट घडविण्यात आला होता. पाकिस्तानीची आयएसआय संघटना पंजाब आणि आसपासच्या राज्यात 26/11 हल्ले करण्याच्या तयारी होते अशी माहिती समोर आली होती. यासाठी या संघटनेकडून पंजाबमध्ये AK – 47 शस्त्र ड्रोनच्या माध्यमातून फेकण्यात आली होती. त्यामुळे या तरनतारनच्या स्फोटात दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले जात असले तरी तपास अद्याप सुरु आहे.