आंबेगाव पठार येथे गॅस गळती होऊन स्फोट

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – आंबेगाव पठार येथील रामा संस्कृती इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एलपीजी सिलेंडर लिकेज होऊन भडका उडाल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली. अचानक मोठा आवाज झाल्याने शेजारील परिसरात मोठी धावपळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी महिला व गॅस सिलेंडर बाहेर काढला. यात स्वयंपाक घरातील किचन ट्रॉली, खिडकीच्या काचा, हॉमलधघील खिडकीच्या काचा फुटल्या, वैशाली चव्हाण (३८) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील रामा संस्कृती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये वैशाली चव्हाण राहतात. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या आणि दोन मुले घरी होती. चव्हाण यांच्या स्वयंपाक घरातील गॅसमधून गळती होत होती. त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्या घरातील देवघरात दिवा लावण्यासाठी गेल्या. त्यावेळी अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी गॅसचा भडका उडाल्याने मोठा स्फोट झाला. यात घरातील खिडक्यांच्या काचा, किचन ट्रॉली, इतर साहित्य फुटले. यात महिलेचा उजवा हात भाजला. त्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिकांची धावपळ उडाली.

स्थानिकांनी तात्काळ घाव घेतली. त्यांनी घरातून महिलेला व त्यांच्या दोन मुलांना बाहेर काढले. त्यानंतर सिलेंडर बाहेर काढून ठेवला. तोवर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन पाहणी केल्यानंतर कुठेही आग लागली नसल्याचे निदर्शनास आले.