टाटा स्टील प्लांटमध्ये साखळी स्फोट

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रकल्पात स्फोट झाला असून यासंबंधीचे वृत्त यूकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तसेच साउथ वेल्स पोलिसांनी याबाबत ट्विट केले आहे. मात्र स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट वेल्समधील टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये तीन स्फोट झाले आहेत. त्यात दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती प्लांट परिसरातील लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटानंतर प्लांटमध्ये आग लागली असून ती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्लांटमध्ये ४००० हून अधिक कर्मचारी काम करतात. स्फोटांमुळं स्थानिकांची घरे हादरली तसेच आगीचे लोळ दूरपर्यंत पसरले होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, प्लांटमध्ये लागलेली आग नियंत्रणात असल्याची माहिती टाटा स्टीलकडून देण्यात आली आहे.

Loading...
You might also like