कारचा स्फोट, पोलीस कर्मचारी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा नजीक कॅनॉलजवळ फोर्ड ऐकॉन कंपनीच्या कारचा स्फोट होऊन जळून खाक झाली. गाडी मालक पोलीस कर्मचारी जावळे हे जखमी झाले आहेत. काल रात्री अकरा वाजता ही घटना घडली.

जखमीवर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती ठिक आहे. चेहऱ्याला किरकोळ मार लागल्याने जावळे यांना गाडी बाहेर काढल्यानंतर गाडीचा स्फोट झाला. वळण न बसल्याने गाडी आदळुन गाडीने पेट घेतला होता. गाडीला जास्त वेग होता. वेगात कॅनोलजवळील वळण न बसल्याने सरळ जाऊन धडकुन पलटी झाली. या दरम्यान गाडीने पेट घेतला होता. तेथून संतोष बोळगे, अनिकेत गुगळे, वैभव भंडारी जात होते. संतोष बोळगे यांनी स्वत:ची गाडी थांबवत व प्रसंगावधान राखत त्या स्थितीत पेटलेल्या गाडीतील जावळे यांना बाहेर काढुन गाडीपासून दुर नेले.

काही क्षणात पेटलेल्या फोर्ड ऐकॉन गाडीचा मोठा स्फोट झाला. त्यांनी १०८ ला फोन करुन जखमी जावळे यांना श्रीगोंदा येथे भरती केले. बोळगे यांनी वेळीच त्यांना बाहेर काढुन माणुसकीची वेगळी ओळख दाखवून दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like